नगरमधील परिचारिका, डॉक्टरांवरील कारवाईला विरोध

पोलिसांनी दबावाखाली घाईने कारवाई केल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई : नगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत याविरोधात राज्य परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. नगर जिल्हा रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद असणार आहेत. याची वेळेत दखल न घेतल्यास राज्यभरातील आरोग्य सेवा बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

 या दुर्घटनेमध्ये परिचारिका आणि डॉक्टरांना दोषी ठरवून निलंबित आणि सेवा समाप्त केल्या गेल्या. पोलिसांनी दबावाखाली घाईने कारवाई केल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

कोणताही चौकशी अहवालात सादर न होता परिचारिका आणि डॉक्टरांवर केलेली कारवाई मागे घेण्याची मागणी करत संघटनेने गुरुवारपासून नगर जिल्हा रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील परिचारिका आणि डॉक्टर यात सहभागी होतील. याचा पुढचा टप्पा म्हणून राज्यभरातील आरोग्य कर्मचारी कामबंद करून आंदोलन तीव्र केले जाईल. – अजय क्षीरसागर, संघटक, राज्य परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी संघटना

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nurses in town protest against action against doctors akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या