मतदार याद्या विभागण्याने अनेकजण अस्वस्थ

इंद्रायणी नार्वेकर

External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
Congress president Mallikarjun Kharge, Sonia Gandhi and Rahul Gandhi
प्राप्तिकर विभाग काँग्रेसकडून १३५ कोटींनंतर ५२४ कोटी वसूल करण्याच्या तयारीत, निवडणुकीपूर्वीच मोठा फटका बसणार

मुंबई : पालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेवरील हरकती व सूचनांची सुनावणी बुधवारी पार पडली असून दोन दिवस चाललेल्या या सुनावणीसाठी ५५५ अर्जदार उपस्थित होते. दरम्यान, पुनर्रचनेवर भाजप, काँग्रेससह शिवसेनेच्या नगरसेवकांनीही हरकती नोंदवल्या होत्या. सुनावणीचा टप्पा पार पडल्यानंतर आता इच्छुक नगरसवेक कामाला लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिकेने प्रभाग पुनर्रचनेचा आराखडा सादर केला व त्यावर हरकती व सूचनाही मागवल्या होत्या. साडेआठशे हरकती व सूचनांवर नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दोन दिवस सुनावणी पार पडली. त्यापैकी केवळ ५५५ अर्जदार उपस्थित राहिले होते. सुनावणीचा टप्पा आता पार पडला असून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेली ही समिती त्यावर अहवाल तयार करणार आहे. २ मार्चपर्यंत समितीने केलेल्या शिफारशी नमूद करून विवरणपत्र आयोगाला पाठवण्यात येणार आहे. 

शिवसेनेला लाभ होईल अशा पद्धतीने ही पुनर्रचना केल्याचा आरोप भाजपकडून केलेला असला तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्याही अनेक नगरसवेकांनी या पुनर्रचनेवर हरकती घेतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील मोठा भाग दुसऱ्या प्रभागात गेला, लोकसंख्येचा असमतोल झाला, किंवा पुनर्रचनेत काही चुकीचे बदल केले अशा स्वरूपाच्या या सूचना आहेत. तर काही प्रभागांमध्ये कोळीवाडे दोन प्रभागांमध्ये विभागले गेल्याबद्दलही तक्रारी करण्यात आल्या आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांकडून हरकती व सूचना नोंदवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात पाच ते दहा मतदार याद्या दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे काही नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. मात्र, त्यांनी हरकती व सूचना देणे टाळले आहे. तर काही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र निर्णय घेऊन एकही हरकत व सूचना नोंदवली नाही. झालेल्या बदलांनंतरही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडणुकीत निवडून आणण्यासाठी तेथील पक्षांतर्गत यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे बदल काहीही झालेले असले तरी उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जात आहे. प्रभागातील जो भाग दुसऱ्या प्रभागात गेला त्या भागातील मतदारांच्या याद्या शाखाप्रमुखांकडे देण्यात आल्या आहेत. गेल्या पाच निवडणुकीत किती मतदान कोणाला झाले याची अभ्यासपूर्ण माहितीही दिली जात आहे.

प्रभाग पुनर्रचना ही अतिशय किचकट प्रक्रिया असल्यामुळे अजूनही अनेक पक्षांच्या नगरसेवकांना नक्की कोणता भाग दुसऱ्या प्रभागात गेला, कोणता नवीन आला याचा पूर्ण शोध लागलेला नाही. त्यामुळे २ मार्चला प्रभाग पुनर्रचना अंतिम झाल्यानंतर मतदार याद्या येतील, तेव्हाच हे चित्र स्पष्ट होईल, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. भाजपनेही आपली तयारी सुरू केली असून किमान १२० जागा निवडून आणण्याची तयारी केली आहे. एकूण प्रभागांमध्ये सहज जिंकता येतील असे प्रभाग किती, थोडा जोर लावावा लागेल असे प्रभाग किती आणि अजिबात हातात नसलेले प्रभाग किती याचा अभ्यास केला जात असल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी सांगितले. अत्यंत कमी फरकाने जिथे नगरसेवक जिंकून आले आहेत अशा प्रभागांवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे, असेही बदल केले असल्याचेही एका नगरसेवकांनी सांगितले.

उमेदवारीची खात्री असलेल्या नगरसेवकांकडून प्रचाराला सुरुवात

सुनावणीचा हा टप्पा पार पडल्यानंतर इच्छुक नगरसेवक आता कामाला लागले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळणार असल्याची खात्री आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवातही केली आहे. आपला सध्याचा प्रभाग आणि प्रस्तावित प्रभाग असे दोन्ही क्रमांक देत नगरसेवकांनी मतदारांना साद घातली आहे. २०१७ च्या निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी २०१७ रोजी लागला होता. त्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नगरसेवकांनी मतदारांचे आभार मानतानाच यापुढेही असाच ‘विश्वास’ दाखवण्याचे साकडेही घातले आहे.