मुंबई : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. आरे वसाहतीमधील युनिट क्रमांक ५, आरे मार्केट येथून सकाळी १०.३० वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि बिरसा मुंडा चौक येथे ही मिरवणूक संपेल. यावेळी नृत्य, गीत, संगीताच्या माध्यमातून मुंबईकरांना संदेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी मेट्रो -३ च्या कारशेडला कडाडून विरोध करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरे वसाहतीमध्ये दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. करोना काळातही यात खंड पडला नव्हता. आदिवासी बांधव सण म्हणूनच हा दिवस साजरा करतात.  यंदाही आरेतील २७ पाड्यांतील आदिवासी बांधव मंगळवारी आदिवासी दिन साजरा करणार असल्याची माहिती आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. जल, जंगल आणि जमीन हेच आमचे आयुष्य आहे. विकासाच्या नावावर आमच्याकडून ते हिसकावून घेऊ नका, असा संदेश मंगळवारच्या मिरवणुकीतून सरकारला देण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Occasion aare colony world tribal day mumbai print news ysh
First published on: 08-08-2022 at 14:51 IST