मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे येथे गुरुवारी मध्यरात्री १२.३० पासून सुरू झालेल्या ३६ तासांच्या जम्बो ब्लॉकमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३१ मे रोजी गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहून या दिवसाची भरपाई करावी लागणार आहे.

मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात तांत्रिक कामांसाठी ३० मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जम्बो ब्लॉक सुरू झाला. हा ब्लॉक रविवार, २ जून रोजी दुपारी १२.३० पर्यंत सुरू राहणार आहे. या मार्गावर वास्तव्यास असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ब्लॉकमुळे कार्यालयात हजर राहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने एक परिपत्रक जारी करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

Anganwadi Workers, Anganwadi Workers Agitation, Unfulfilled Promises , Anganwadi Workers Agitation, latest news, loskatta news,
अंगणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
maharashtra Governor Ramesh Bais
लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती? बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी
st mahamandal employees salary
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला, २३० कोटी रुपये निधी वितरित
msrtc, st, msrtc Employees Protest in Panvel, msrtc Employees Protest Unpaid salary, st employees unpaid salary, panvel news,
पगार न झाल्याने पनवेल आगारातील एसटी कामगारांचा घंटानाद
Increase in rent in the name of survey to houses in Vasai Allegation of MLA Rajesh Patil in Assembly
वसईतील घरांना सर्वेक्षणाच्या नावाखाली वाढीव घरपट्टी; आमदार राजेश पाटील यांचा विधानसभेत आरोप
mla dr deorao holi complaint ias officer shubham gupta to chief minister
अखेर ‘त्या’ वादग्रस्त आयएएस अधिकाऱ्याची चौकशी होणार, आमदाराच्या तक्रारीवरून दोन वर्षानंतर…
congress likely to contest at least 84 seats in maharashtra assembly elections
विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता
Mamata Banerjee letter to Narendra Modi asking him to review the criminal laws
गुन्हेगारी कायद्यांचा फेरआढावा घ्या; घाईने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी पुढे ढकलण्यासाठी ममतांचे मोदींना पत्र

हेही वाचा >>>१२ वर्षांनंतरही गहाळ १,४०१ नस्तींचे प्रकरण गुलदस्त्यातच

आयोगातील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३१ रोजी कार्यालयात येणे गैरसोयीचे आणि कठीण होईल. त्यामुळे ३१ मे रोजी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा न कापता त्यांना नंतर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहून सदर दिवसाची भरपाई करण्याची मुभा देण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे जम्बो ब्लाक कालावधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र या दिवसाची भरपाई म्हणून संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना एखाद्या सुट्टीच्या दिवशी  कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.