समाजमाध्यमावरून राज्यपालांविषयी आक्षेपार्ह मजकूर; एकाला अटक

भारतीय दंडविधानासह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजमाध्यमावरून राज्यपालांविषयी आक्षेपार्ह मजकूर; एकाला अटक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी समाजमाध्यमावरून अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी प्रदीप भालेकर या माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्याला रविवारी रात्री अटक केली.

भालेकरने राज्यपालांविषयी समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याची बाब पोलीस शिपाई अनिल वारे यांना रविवारी निदर्शनास आली. भालेकरच्या समाजमाध्यमावरील खात्यावर राज्यपालांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध करण्यासह राज्यपालांविरोधात त्याने डिजिटल मोहीमही सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर वारे यांनी सायबर पोलिसांत भालेकरविरोधात तक्रार नोंदवली.

राज्यपालांचा अपमान व बदनामी करणारा मजकूर समाजमाध्यमावरून प्रसिद्ध करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा आणि शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न भालेकर याने केला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच वारे यांच्या तक्रारीच्या आधारे त्याच्यावर भारतीय दंडविधानासह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरे आंदोलकांवर गुन्हा, एकाला अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी