मुंबई : कुर्ल्यातील इमारत दुर्घटनाप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी स्वत: गुन्हा दाखल केला आहे. दिलीप कृष्णा विश्वास असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विश्वाससह घरमालक रजनी राठोड, किशोर चव्हाण, बाळकृष्ण राठोड व इतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद पाठक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. इमारत धोकादायक असल्यामुळे ती पडू शकते याची कल्पना असतानाही घरमालकांसह दिलीप कृष्ण विश्वास यांनी घरे भाडेतत्त्वावर राहण्यासाठी दिली होती. इमारतीत जवळपास ३७ कामगारांना राहण्यासाठी घरे देण्यात आली होती.

कुर्ला नेहरूनगर एसटी डेपोमागेही नाईक नगर सोसायटी असून यातील डी ही इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळली. ही इमारत ६० ते ७० वर्षे जुनी असल्याने, इमारतीची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे २०१३ मध्ये पालिकेने या इमारतीला धोकादायक ठरवून वीज आणि पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र येथील रहिवाशांनी पुन्हा वीज आणि पाण्याची जोडणी करून घेतली होती. त्यानंतर मुख्य घरमालकांनी इतर ठिकाणी वास्तव्य करून, ही घरे भाडेतत्त्वावर दिली होती. याठिकाणी दहा ते बारा कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून राहत होते. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचाही या इमारतीमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. ही इमारत सोमवारी रात्री कोसळून या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले आहे. यातील ४ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
nagpur court marathi news, nagpur petitioner donate 25 thousand
दे दान सुटे गिऱ्हाण! कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावली अनोखी शिक्षा; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न