मुंबईमधील लालबाग परिसरामधील अगदी प्राइम ठिकाणी असलेल्या वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. पाचव्या मजल्याला लागलेली आग हळूहळू १९ व्या मजल्यापर्यंत पोहचल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यानंतर अर्ध्या तास उलटून गेल्यानंतरही या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामन दलाच्या गाड्या पोहचल्या नव्हत्या. अग्निशामन दलाच्या १५ गाड्या या ठिकाणी आग विझवण्याचं काम करत आहे. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ही इमारत तिच्या अवढव्या आकारामुळे चांगलीच परिचयाची आहे. आग लागल्यामुळे चर्चेत आलेल्या या इमारतीलमधील सर्व घरं ही आलीशान म्हणजेच किमान थ्री बीएचकेची आहेत. या घरांची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

लालबागमधील भारतामाता या आयकॉनिक थेअटर समोर असणारी ही इमारत ६० मजल्यांची आहे. मुंबईत सर्वात आलिशान फ्लॅट्स असणाऱ्या मोजक्या इमारतींमध्ये या इमारतीचा समावेश होतो. या इमारतीमध्ये किमान थ्री बीएचकेचे फ्लॅट्स आहेत. रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.

घर खरेदी विक्रीसंदर्भातील मॅजिक ब्रिक्स या वेबसाईटवरील माहितीनुसार या इमारतीमधील थ्री बीएचके घरांचा एरिया दोन हजार स्वेअर फुटांचा आहे. यामध्ये तीन बाथरुमचाही समावेश आहे. या थ्री बीएचके घरांची किंमत ४ कोटींपासून सुरु होते. लक्झरी थ्री बीएचके फ्लॅट १२ कोटींच्या पुढेच आहे. फोर बीएचकेची किंमत ही ७ कोटींपासून सुरु होते. थ्री बीएचकेप्रमाणेच लक्झरी फोर बीएचकेही मूळ किंमतींपेक्षा अधिक दराला उपलब्ध आहेत. यामध्ये प्लोअर राईज आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यास किंमत वाढते.

तर ९९ एकर्स या वेबसाईटवरील माहितीनुसार या इमारतीमधील फाइव्ह बीएचके फ्लॅट्स हे ६६०० स्वेअर फुटांचे आहेत. या मध्ये पाच बेडरुम आणि पाच बाथरुम आहेत. या घरांचा दर ८० हजार ३०३ रुपये प्रती स्वेअर फूट इतका आहे. त्यामुळेच पाच बीएचके घराची किंम ५३ कोटी रुपये इतकी आहे.

असं असलं तरी आगीच्या घटनेनंतर आता या इमारतीच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.दुपारी १२ च्या सुमारास १९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किट झाले आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या आगीमध्ये वरील काही मजलेही जळून खाक झाले आहेत.

आगीच्या घटेनंतर पहाणी करण्यासाठी आलेल्या आयुक्तांसमोर रहिवाशांनी बिल्डकरुन देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत असा संताप व्यक्त केलाय. साधी पाण्यासाठीही मारामार करावी लागते आणि सांगितलेल्या सुविधा देण्यात आलेल्या नाहीत असा आरोप रहिवाशांनी केलाय.