लालबागमधील ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग; १९ व्या मजल्यावरुन पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना १९ व्या मजल्यावरील ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो

one avighna park fire
लालबागमध्ये आहे ही आलिशान इमारत

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल चारची म्हणजे फारच भीषण असल्याचं सांगण्यात येत आहे.

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थेअटर समोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे. पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आलीय. स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. मरण पावलेल्या सुरक्षारक्षकाचं नाव राम तिवारी असं असून इमारतीमध्ये आणखी दोन जण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. तासाभरानंतर अग्निशामन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. १९ व्या माळ्यावर फर्निचरचे काम सुरु असताना शॉकसर्किट झाले आणि आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. दरवाजा उघडल्यानंतर आग अंगावर आल्याने सुरक्षारक्षकाने पळण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाल्कनीमध्ये गेला. तिथे तो लटकत होता तिथून तो खाली. खाली पडल्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला. केईएम रुग्णालयामध्ये या ३० वर्षीय सुरक्षारक्षकाला दाखल करण्यात आलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो. तसेच आग १९ व्या मजल्यावर असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One avighna park fire lalbaug scsg

ताज्या बातम्या