scorecardresearch

Premium

सीएसएमटी स्थानकात लोकलचा एक डबा घसरला, लोकल पुढे जाण्याऐवजी पुन्हा मागे आली, हार्बर लोकल सेवा विस्कळीत

सीएसएसटी रेल्वे स्थानकातून पनवेलसाठी लोकल निघत असतांना एक डबा घसरल्याची माहिती आहे

one coach of local train derailed at CSMT railway station, harbor services disturbed
हार्बर लोकल सेवा विस्कळित, सीएसएमटी स्थानकावर लोकलचा एक डबा घसरला

सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर एकवर लोकल ट्रेनचा एक डबा घसरला आहे. पनवेल लोकल ही सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लटफॉर्म नंबर एक वरुन निघत असतांना ही घटना घडली. लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि ती बफरला धडकली, त्यावेळी लोकलचा डबा घसरला. या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सीएसएमटी स्थानकातून सकाळी ९.३९ वाजता पनवेलच्या दिशेने निघालेल्या लोकलच्या मागील चौथ्या डब्याची दोन चाके रूळावरून घसरली. या लोकलला पुढे जाण्यासाठी सिग्नलही मिळाला होता. मात्र ही लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला धडकली. यामुळे लोकल वा बफरचे कोणतेही नुकसान झाले नाही. तर प्रवासीही जखमी झाले नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून लोकलचा डबा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
ajit pawar and devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू”, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

सीएसएमटी रेल्वे स्थानकात हार्बर मार्गासाठी प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन वरुन लोकल ट्रेन रवाना होत असतात. मात्र एका प्लॅटफॉर्मवरच ही दुर्घटना घडल्याने आता फक्त दुसरा आणि एकमेव रेल्वे प्लॅटफॉर्म हार्बर रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. यामुळे हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात हार्बर मार्गासाठी असलेल्या एकाच प्लॅटफॉर्मवरुन लोकल वाहतुक सुरु असल्याने सध्या सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा बंद ठेण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बरच्या तिकीट आणि पासावर सध्या कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान मुख्य रेल्वे मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One coach of local train derailed at csmt railway station harbor services disturbed asj

First published on: 26-07-2022 at 10:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×