महिलांची एक कोटी रुपयांची फसवणूक

राम करंदीकर हा ज्योतिषाचे काम करत असे. त्याची महिलांबरोबर ओळख झाली होती.

मुंबई : पतपेढीत रक्कम ठेऊन त्यावर जास्त व्याज देण्याच्या बहाण्याने एका ज्योतिषाने दोन ज्येष्ठ नागरिक महिलांची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्योतिषाला अटक केली आहे. राम करंदीकर असे त्याचे नाव आहे.

राम करंदीकर हा ज्योतिषाचे काम करत असे. त्याची महिलांबरोबर ओळख झाली होती. करंदीकर हा पतपेढी चालवितो. या पतपेढीत जमा केलेल्या रकमेवर १२ टक्क्यांनी व्याज देतो, असे आश्वासन त्याने या महिलांना दिले होते. त्यावर विश्वास ठेऊन एका महिलेने १५ लाख रुपये, तर अन्य एका महिलेने ५० लाख रुपये आणि ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने या पतपेढीत ठेवले होते. ज्योतिषाच्या पतपेढीत ठेवलेल्या या रकमेची मुदत उलटून गेल्यावर महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र करंदीकरने हे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  दरम्यान पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील महिनाभरात सर्व रक्कम देण्याचे त्याने मान्य केले होते. मात्र जानेवारी महिन्यात ही वेळ उलटून गेली. तोपर्यंत करंदीकर पसार झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One crore rupees fraud women crime news mumbai akp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक