मुंबईत मेट्रो सिनेमाजवळ झाड कोसळून एकाचा मृत्यू, चार जण जखमी

मुंबईतील एम. जी. रोडवर मेट्रो सिनेमाजवळ एक झाड कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईतील एम. जी. रोडवर मेट्रो सिनेमाजवळ एक झाड कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


पावसाळ्यात झाडं पडण्याच्या घटना सातत्याने घडत असून यापूर्वीही शहरात अनेकदा झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक वाहनांचेही नुकसानही झाले आहे.

यापूर्वी ९ जून २०१८ रोजी दहीसरमधील एस. एन. दुबे या रोडवर दृष्टी मुंगरा या मुलीचा झाड अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. १९ एप्रिल २०१८ रोजी दादर पूर्व भागात दिनेश सांगळे यांचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. ७ डिसेंबर २०१७ रोजी शारदा घोडेस्वार या महिलेचा चेंबूरमध्ये बसस्टॉपवर झाड कोसळून मृत्यू झाला होता. २३ जुलै २०१७ रोजी किशोर पवार या वकिल व्यक्तीचा ठाण्यातल्या पाचपखाडी परिसरात झाड कोसळून मृत्यू झाला होता. २२ जुलै २०१७ रोजी दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ यांचा मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचं झाड कोसळून मृत्यू झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One dead 5 injured after a tree fell on them at mg road near metro cinema in mumbai