Premium

धारावी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू, आरोपीला अटक

धारावी येथे मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

One man died fight in Dharavi
धारावी येथे मारहाणीत एकाचा मृत्यू, आरोपीला अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईः धारावी येथे मारहाणीत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय जाधव (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो राजीव गांधी नगर येथील ट्रान्झिट कॅम्प येथील रहिवासी होता. २९ मे रोजी दारूच्या नशेत घराच्या बाजूला काम सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी आरोपींनी जाधव याला तेथून जाण्यास सांगितले. पण दारूच्या नशेत असल्यामुळे आरोपी व जाधव यांच्यात वाद झाला. त्यातून आरोपीने लाथा-बुक्क्याने केलेल्या मारहाणीत जाधव खाली कोसळला. त्याप्रकरणी जाधवचा मृत्यू झाल्यानंतर अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात’

जाधवची पत्नी शुभांगी जाधव यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. फिरोज शेख, कासिम कॉन्ट्रॅक्टर, बबलू, एहसान यांच्याविरोधात धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी शुक्रवारी फिरोज शेख (३३) याला पोलिसांनी अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One died in fight in dharavi accused arrested mumbai print news ssb

Next Story
‘आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात’