scorecardresearch

एक लाख मुंबईकरांना घडला एका रुपयांत ‘बेस्ट’ प्रवास

‘बेस्ट आझादी’ योजनेंतर्गंत ‘चलो ॲप’चा पहिल्यांदा वापर करणाऱ्या प्रवाशांना मिळाला लाभ

एक लाख मुंबईकरांना घडला एका रुपयांत ‘बेस्ट’ प्रवास
(संग्रहीत छायाचित्र)

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘बेस्ट’च्या महानगर पालिकाकरणाचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने जाहीर केलेल्या ‘बेस्ट आझादी’ योजनेंतर्गंत ‘चलो ॲप’चा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत उपलब्ध करण्यात आला.

या प्रवाशांना वातानुकूलित किंवा विनावातानुकूलित बसमधून सात दिवस कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. आतापर्यंत ‘बेस्ट आझादी’ योजनेचा एक लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांनी लाभ घेतल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली. याअंतर्गंत प्रवाशांना तिकीट आणि बसपास खरेदी करता यावी यासाठी मोबाइल तिकीट ॲप आणि बेस्ट ‘चलो एनसीएमसी’ कार्ड उपलब्ध करण्यात आले होते. डिजिटल तिकिट चार लाख बेस्ट प्रवासी आणि ‘बेस्ट चलो’ ॲपचे २४ लाख वापरकर्ते आहेत. या प्रणालीला चालना देण्याचा उद्देशाने २ ऑगस्टपासून ‘बेस्ट आझादी’ योजना सुरू करण्यात आली. ही योजना १५ ऑगस्टपर्यंत आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.