पैशांच्या वादातून एकाची हत्या

ठाणे येथील भिमनगर भागात शुक्रवारी रात्री पैशांच्या देवाण-घेवाणवरून झालेल्या वादातून एका तरूणाची सुऱ्याने हत्या करण्यात आल्याची घटना घडली

ठाणे येथील भिमनगर भागात शुक्रवारी रात्री पैशांच्या देवाण-घेवाणवरून झालेल्या वादातून एका तरूणाची सुऱ्याने हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी मयूर साळवी, राय करोतीया, प्रेम करोतीया, सरोज करोतीया  या चौघांना अटक केली आहे.  विजय गोपाळ सरपटे (२५), असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो वर्तकनगर येथील भिमनगर परिसरात राहत होता.  प्रेम याने विजयकडे मोबाईल गहाण ठेवून पाचशे रुपये घेतले होते. पाचशे रुपये देऊन प्रेमने विजयकडे गहाण ठेवलेला मोबाईल मागितला. विजयने त्याच्याकडे जास्त पैशांची मागणी केली. यावरून झालेल्या वादातून  हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One murdered in money conflict