मुंबई : अभिनेता सलमान खान याला धमकीचा ई-मेल पाठवल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताला राजस्थानमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

सलमान खानच्या वतीने प्रशांत नरेंद्र गुंजाळकर (४९) यांनी वांद्रे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती.  गेल्यावर्षी जून महिन्यात सलमान याला अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र लिहून सिद्धू मुसेवाला प्रमाणे जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईने नवीन मुलाखतीत सलमान याला पुन्हा धमकी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी राजस्थानमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
tejashwi yadav on modi guarantee
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी ही चीनच्या वस्तूंसारखी…”, तेजस्वी यादव यांचा भाजपाला टोला