वनप्लस कंपनीने अखेर आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन OnePlus 6 भारतात लॉन्च झाला असून अॅमेझॉनवर तो आज (२१मे) दुपारी १२ वाजल्यापासून पहिल्यांदा त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला. तर उद्यापासून (२२ मे) सर्वांसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. भारतात या फोनच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत ३४,९९९ रुपये इतकी आहे. या किंमतीत 6 GB ऱॅम आणि 64 GB स्टोरेज उपलब्ध असणार आहे. OnePlus 6 हा 6 GB आणि 8 GB रॅम तसेच 64 GB/ 128GB/ 256GB स्टोरेजसह कंपनीने सादर केला आहे. एसबीआय कार्डवरुन खरेदी केल्यास या फोनवर २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. त्याचबरोबर आयडीयासोबत हा फोन घेतल्यासही ग्राहकांना २००० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्मार्टफोनमध्ये मिरर ब्लॅक फिनिश, मिडनाइट ब्लॅक आणि सिल्क व्हाइट या रंगात संपूर्ण जगात लॉन्च करण्यात आला आहे. OnePlus 6 हा स्मार्टफोन पूर्णतः वॉटरप्रूफ आहे. फोनबरोबरच कंपनीने वायरलेस चार्जिंगसाठी डॅश चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. मात्र, यासाठी डॅश चार्जर वेगळा खरेदी करावा लागणार आहे. कंपनीने भारतात खासकरुन मार्वल अॅवेंजर्स इन्फिनिटी वॉर हे मॉडेलही लॉन्च केले आहे. या फोनसोबत 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध असणार आहे. या फोनची किंमत ४४,९९९ रुपये इतकी असणार आहे. तर 8GB रॅमसह 128 GB स्टोरेजच्या फोनची किंमत ३९,९९९ रुपये इतकी असणार आहे.

OnePlus 6 चे स्पेसिफिकेशन्स :

OnePlus 6 मध्ये ६.२८ इंचाचा फुल एचडीप्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अॅस्पेक्ट रेशो १९:९ इतका आहे. यामध्ये कंपनीने पहिल्यांदाच डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे संरक्षण दिले आहे. वनप्लस ६ हा लेटेस्ट अॅन्ड्रॉईड ओरियो ८.१ सह उपलब्ध असणार आहे. मात्र, काही दिवसांनंतर युजर्सना अॅन्ड्रॉईड पी ऑपरेटिंग सिस्टिमचे बीटा व्हर्जन उपलब्ध होणार आहे.

याशिवाय या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ क्षमतेचा प्रोसेसर आहे. फोनच्या समोरच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये 3300mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी अर्धा तासाच झालेल्या चार्जिंगवर दिवसभर राहू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. OnePlus 6 च्यामागे दोन कॅमेर आहेत. यातील एक कॅमेरा 16 मेगा पिक्सल तर दुसरा 20 मेगापिक्सलचा आहे. तर समोरचा कॅमेरा 16 मेगा पिक्सलचा आहे. मागील कॅमेराने 4K व्हिडिओ चित्रीकरण करता येते.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus 6 launches in india selling starting from today 8 gb ram will be available with 256 gb of storage
First published on: 21-05-2018 at 18:32 IST