लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व पुण्यातील १९ ठिकाणी शोध मोहीम राबवली. आयपीएल प्रसारणसह फेअरप्ले ॲपद्वारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही सट्टेबाजी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान रोख, बँक खात्यातील रक्कम, डीमॅट खाते आणि महागडी घड्याळे अशी एकूण आठ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. या कारवाईत गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांसह डिजिटल उपरणेही जप्त करण्यात आली आहेत.

BJP, Chintan, meeting,
भाजपची पुण्यातील चिंतन बैठक लांबणीवर, आता २१ जुलै रोजी नियोजन
anna bansode
“विधानसभेसाठी अनेकांकडून संपर्क, मात्र मी…”, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंचं ठरलं
ED raids at 12 places in case of 975 crores fraud
मुंबई : ९७५ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ईडीचे १२ ठिकाणी छापे
Sangli, Congress, Sharad Pawar group,
सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासूनच कुरघोड्या सुरू
Mahavikas Aghadi, pune,
पुण्यात दोन मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच
Uddhav Thackeray in trouble The investigation into the allegations against the Election Commission is underway
उद्धव ठाकरे अडचणीत? निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर शहानिशा सुरू
Thane district has the highest number of graduate voters
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त
Mumbai North West Lok Sabha Constituency result, Vanrai Police Register Case Against Thackeray Group MLA, Entry Violation at Counting Center Mumbai North West seat, amol kirtikar, ravindra waikar,
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ निकाल प्रकरणाला नवे वळण, ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी फेअर प्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशिररित्या सामन्यांचे प्रसारण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.

आणखी वाचा-पर्समध्ये राहील असेच पुस्तक महिलांना वाचायला आवडते – डॉ. नीलम गोऱ्हे

वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण फेअर प्ले या ॲपवर सामान्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार वायकॉम १८ ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणाच्या आधारारावर ईडीनेही तपासाला सुरूवात केली होती.

फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संस्थांसोबत करार केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच भारतीय संस्थांनी, कंपन्यांनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही.

आणखी वाचा-नीट परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, पुनर्परीक्षा घेण्याची इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची मागणी

फेअर प्लेने विविध बनावट कागदपत्राद्वारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांद्वारे निधी गोळा केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच बनावट बँक खात्यातील रकमेटा वापर करून ऑनलाईन माध्यमाध्यमातून व्यवहार करण्यात आले. त्यासाठी औषध कंपन्यांच्या पावत्यांचा वापर करण्यात आला. हा निधी हाँगकाँग, चीन आणि दुबई येथील परदेशी बनावट कंपन्यांना पाठवण्यात आला आहे. त्यासाठी ४०० हून अधिक बँक खात्यांचा वापर करण्यात आला. त्या अनुषंगाने बुधवारी ईडीने मुंबई व पुण्यातील १९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.