मुंबई : ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत सध्या ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणीपुरवठय़ाचे नियोजन ठरणार आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ मुंबईवर येऊ शकेल. उन्हाचा ताप हळूहळू वाढू लागला आहे. 

एप्रिल महिना जवळ आला की मुंबईकरांनाही पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला व मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबररच्या अखेरीस धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा ३७ टक्क्यांवर आला आहे. उन्हाळय़ाचे दोन महिने व पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंतचे दोन महिने असे चार महिने याच पाणीसाठय़ावर मुंबईकरांची मदार असणार आहे.

Water supply stopped in Goregaon Malad Kandivali on Tuesday
मुंबई : गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका

गेल्या वर्षी याच वेळी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता.  ऊध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. सातही तलावांतील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहोचल्यानंतर मुंबईकरांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. तसेच तलावांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल या दृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. सर्व तलाव १ ऑक्टोबररला पूर्ण क्षमतेने भरले असले तर वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहतो. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर पाणी कपात करण्याची वेळ येते. या वर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून व जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर मुंबईच्या पाणीपुरवठय़ाचे भविष्य असेल.