मुंबई : व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात त्याच्या नाकाची ठेवण महत्त्वाची ठरते. नाक चपटे, बसके, वाकडे असल्यास व्यक्तीच्या सौंदर्यावर फरक पडतो. त्यामुळे अनेकांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपले सौंदर्य वाढविण्यासाठी नाकावर सुघटनशल्य शस्त्रक्रिया करून घेतात.  मात्र सर्वसामान्य नागरिकांना आपल्या नाकावर सुघटनशल्य शस्त्रक्रिया करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मात्र, जी. टी. रुग्णालयामध्ये सुघटनशल्य शस्त्रक्रिया करून ओबडधोबड, बसके, चपटे नाक व्यवस्थित करून घेण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.

नाकावरील सुघटनशल्य शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर निष्णात आणि निपुण व्हावेत या उद्देशाने जीटी रुग्णालयात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत देशातील तज्ज्ञ सुघटन शल्य डॉक्टरांकडून चेहऱ्यावरील सौंदर्यविषयक विविध शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक डॉक्टरांना दाखविण्यात येणार आहे. कार्यशाळेत डॉ. नितीन मोकल, डॉ. उदय भट, डॉ. मिलिंद वाघ, डॉ. कपिल अगरवाल, डॉ. आदित्य अगरवाल आदी तज्ज्ञ डॉक्टर देशभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत. सुघटनशल्य शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होणाऱ्या या कार्यशाळेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या कार्यशाळेला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदा २८ व २९ जानेवारी रोजी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नायर रुग्णालयाच्या सहकार्याने जी. टी. रुग्णालयात सुघटनशल्य विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन मोकल यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा होत आहे.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

हेही वाचा >>> धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

या कार्यशाळेत आमंत्रित स्थानिक अध्यापक सौंदर्य आणि पुनर्रचनात्मक सुघटनशल्य शस्त्रक्रियेतील बारकावे, मूल्यांकन, नियोजन, शस्त्रक्रियेचे तंत्र आणि इतर शैक्षणिक बाबींवर सर्वसमावेशक मार्गदर्शन करणार असून, या कार्यशाळेचा लाभ सर्व सुघटनशल्य चिकित्सक, निवासी आणि सल्लागार यांना होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत साधारणपणे आठ ते दहा रुग्णांच्या नाकावर देशातील तज्ज्ञ सुघटन शल्य डॉक्टरांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी निवड झालेल्या व्यक्तींवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे आपले ओबडधोबड, चपटे, बसके नाक व्यवस्थित करून चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये वाढ करायची असेल अशा व्यक्तींना देशातील तज्ञ सुघटनशल्य डॉक्टरांकडून मोफत शस्त्रक्रिया करून घेण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक व्यक्तींनी जीटी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. नितीन मोकल यांनी केले आहे.

हेही वाचा >>> मालाडमधील १०० वर्षे जुनी इमारत काळाच्या पडद्याआड..

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टरांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या १०० डॉक्टरांना सभागृहात थेट शस्त्रक्रिया पाहता येणार आहे तर १०० पेक्षा अधिक डॉक्टरांना ऑनलाईन शस्त्रक्रिया पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑपरेटिव्ह वर्कशॉपही मेडीट्यूबवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहे.

मृत व्यक्तीच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्याची डॉक्टरांना संधी

नाक सुघटनशल्य कार्यशाळेमध्ये देशातील तज्ञ डॉक्टरांकडून चिकित्सक, निवासी आणि सल्लागार डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे ज्ञान मिळवता येणार आहे. या कार्यशाळेत व्यक्तीच्या नाकावर थेट शस्त्रक्रिया करून दाखवण्यात येणार आहे. तसेच यंदा प्रथमच मृत व्यक्तीच्या नाकावर शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नितीन मोकल यांनी दिली.