मुंबई : मालाड येथे अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यास गेलेल्या पालिकेच्या पथकाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले. अनधिकृत बांधकाम करणाऱ्याने तोडक कारवाईला विरोध केला. मात्र अधिकारी मागे हटत नसल्याचे पाहून त्याने जवळच असलेली वीट स्वतःच्याच डोक्यात वारंवार मारून घेतली. तसेच स्वतःला जाळून घेण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात पालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली आहे.

मालाड पश्चिमेकडील मार्वे येथे बगिचा हॉटेलसमोर एका मोकळ्या जागेवर एक अनधिकृत गाळा बांधण्यात आला आहे. या गाळ्याचे बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचे अधिकारी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास गेले असता ही घटना घडली. मुकादम आणि चार कामगार व एक जेसीबी असे पथक दुय्यम अभियंत्यांसोबत घटनास्थळी गेले होते. पाडकाम करत असताना या गाळ्याचे मालक योगेश राव यांनी पथकाला कारवाई करण्यास विरोध केला. आधी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, धक्काबुकी केली. तरीही कारवाई थांबत नसल्याचे पाहून राव यांनी पालिकेच्या अभियंत्यांला शिविगाळ करण्यास सुरुवात केली व तसेच त्याला नोकरी घालवण्याची धमकी दिली. तरीही पथकाने कारवाई न थांबवल्यामुळे राव याने जवळच असलेली वीट घेऊन स्वतःच्याच डोक्यात मारण्यास सुरुवात केली. तसेच तुम्ही इथून गेला नाहीत तर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेईन, अशी धमकीही दिली. त्यानंतर उपस्थितांनी राव याला समजावून शांत केले. मात्र याप्रकरणी पालिकेच्या पी उत्तर विभागाने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी वरील माहिती दिली आहे.

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Why is the surrender of Naxalite godmother Tarakka important
३४ वर्षांपासून चळवळीत… १७० हून अधिक गुन्हे, चार राज्यांत १ कोटींचे बक्षीस… नक्षलींची ‘गॉडमदर’ तारक्काचे आत्मसमर्पण का महत्त्वाचे?
MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती
Story img Loader