विजयपत सिंघानिया यांच्या आत्मचरित्राची विक्री रोखण्याचे आदेश

‘रेमंड’ समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया (८३) यांचा या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आणि ‘रेमंड’ कंपनीसोबत कायदेशीर वाद सुरू आहे.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या ‘अ‍ॅन इनकम्प्लिट लाईफ’ या आत्मचरित्राची विक्री आणि वितरण रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.

‘रेमंड’ समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया (८३) यांचा या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया आणि ‘रेमंड’ कंपनीसोबत कायदेशीर वाद सुरू आहे. या आत्मचरित्रातील मजकूर बदनामीकारक असल्याचा दावा करून कं पनी आणि तिचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी २०१९ मध्ये ठाणे सत्र न्यायालय तसेच मुंबईतील दिवाणी न्यायालयात विजयपत सिंघानिया यांच्याविरोधात दावा दाखल केला होता. तसेच आत्मचरित्राच्या प्रकाशनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

कंपनीचा दावा काय ?…उच्च न्यायालय आणि ठाणे सत्र न्यायालयाने फेब्रुवारी ते एप्रिल २०१९ दरम्यान विजयपत सिंघानिया यांना त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यासकिं वा प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करणारे अनेक आदेश दिले होते. परंतु विजयपत सिंघानिया आणि प्रकाशकांनी आदेशाचा जाणीवपूर्वक अवमान करून आत्मचरित्र प्रकाशित केले. तसेच ते बाजारात विक्रीसाठी आणले, असा आरोप कंपनीने केला होता. ठाणे सत्र न्यायालयाचे कामकाज दिवाळीच्या सुट्टीमुळे बंद असल्याने थेट उच्च न्यायालयात दाद मागितल्याचेही याचिकेत म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Order to stop sale of vijaypat singhania autobiography akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या