scorecardresearch

मरणोत्तर अवयवदानाला वेग

मृत्यूनंतर अवयवदान करण्याची या रुग्णाची अंतिम इच्छा होती.

मुंबई : मागील काही दिवसांत अवयवदान मोहिमेने चांगलाच वेग घेतला असून या वर्षातील तिसरे अवयवदान गुरुवारी झाले आहे. ४५ वर्षीय मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानासाठी संमती दिल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. आठ दिवसांत शहरात तीन रुग्णांचे मरणोत्तर अवयवदान केले आहे.

४५ वर्षीय रुग्णांचा मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर अवयवदान करण्याची या रुग्णाची अंतिम इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिली. रुग्णांचे मूत्र्रंपड, यकृत, हृदय आणि नेत्रपटल दान करण्यात आले. यातील एक मूत्र्रंपड आणि हृदय रुग्णांचा मृत्यू झालेल्या एच.एन.रिलायन्स रुग्णालयाला देण्यात आले. तर दुसरे मूत्र्रंपड अपोलो रुग्णालयातील आणि यकृत ग्लोबल रुग्णालयातील रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले गेले. नेत्रपटल बचुभाई नेत्रपेढीला दिले आहे. अवयवदान करण्याची इच्छा असल्यामुळे रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवांच्या रूपाने रुग्ण पुन्हा नवीन जीवन जगणार असून या कृतीने नवे प्रोत्साहन कुटुंबाला दिल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे. दुसरे अवयवदान २३ जानेवारीला झाले असून यामध्ये ५३ वर्षीय रुग्णाचा मेंदूमृत झाल्यानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्यास संमती दिली होती. या रुग्णांचे यकृत आणि मूत्र्रंपड दान करण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Organ donation drive is well underway 45 year old brain dead consent for organ donation by relatives akp