लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून झालेल्या छळवणुकीविरोधात निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने पुकारलेल्या संपाला रुग्णालयातील अन्य संघटनांसह देशातील डॉक्टरांच्या संघटनाकडूनही पाठिंबा मिळू लागला आहे. रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने, तसेच देशातील आयएमएच्या ज्युनिअर डॉक्टर संघटनेपाठोपाठ राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या ‘फोर्डा’ या संघटनेने ‘मार्ड’ला पाठिंबा जाहीर केला आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून वारंवार देण्यात येणारा त्रास, शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम, निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रियेचा अनुभव न देणे, त्यांची अश्लील भाषेमध्ये खरडपट्टी करणे, त्याचबरोबर डॉ. पारेख आणि डॉ. लहाने हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने विभाग चालवत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून डॉ. पारेख आणि बेकायदेशीर, अनैतिक आणि निवासी डॉक्टांच्या विरोधात असलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांची बदली करावी. तसेच आवश्यक पदांवर प्राध्यापकांची तातडीने भरती करावी या मागण्यांसाठी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने ३१ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून संप पुकारला आहे.

हेही वाचा… गोष्ट मुंबईची: भाग ११४- मुंबईतही आहेत, विविध राजांचे शिलालेख

आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका ‘मार्ड’ने घेतली आहे. निवासी डॉक्टरांच्या या संपाला आता महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जे. जे. रुग्णालयातील शाखेने पाठिंबा जाहीर केला आहे. ‘मार्ड’ने केलेल्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, असे पत्र परिचारिका संघटनेकडून ‘मार्ड’ आणि रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेनेही ‘मार्ड’ला पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा… ‘पुरावा कायदा’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकांचा भडिमार; मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील तृतीय वर्ष सहाव्या सत्र परीक्षेत घोळ

रुग्णालयातील कर्मचारी संघटनासोबतच राष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांच्या संघटनांनीही या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) ज्युनिअर डॉक्टर संघटनेचा समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याविरोधात कठोर कारवाई करून निवासी डॉक्टरांचे भविष्य सुरक्षित करा, अशी मागणी आयएमच्या ज्युनिअर डॉक्टर संघटनेने केली आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या ‘फोर्डा’ संघटनेनेही ‘मार्ड’ला पाठिंबा जाहीर केला आहे.