मुंबई पोलिसांनी देवनारमध्ये २,५०० किलोहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलेल्या ९ काँग्रेस आमदारांना पक्षाकडून नोटीस

१० जणांना अटक

वाहनातून गोंमासची वाहतूक होत असल्याची माहिती एका पशु कल्याण संस्थेने पोलिसांना दिली होती. मिळालेल्या माहितीच्या अधारे देवनार पोलिसांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर सापळा रचत संबंधित वाहनाला अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यात २,५०० किलो गोमांस आढळून आले. पोलिसांनी हे गोमांस ताब्यात घेतले असून या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- ‘मुसावाला की तरहा तुझे भी मार देंगे’; सलमान खाननंततर आता चित्रपट निर्मात्याला धमकी

गोमांसाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार
शफिक ताडा नावाच्या व्यक्तीच्या मदतीने हे गोमांस मालेगाव येथून आणण्यात आले होते आणि साजिद कुरेशी नावाच्या व्यक्तीला ते विकण्यात येणार होते. जप्त केलेल्या गोमांसाचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.