कुलदीप घायवट

मुंबईला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. मुंबईत उभ्या असलेल्या ऐतिहासिक वास्तू त्या इतिहासाची साक्ष देतात. वाहने, इमारती, पूल, रस्ते आणि माणसांच्या गर्दीने गजबजलेल्या मुंबईतही एकेकाळी घनदाट जंगल होते आणि तेथे, टेकडय़ांच्या ठिकाणी असंख्य पशु-पक्ष्यांच्या प्रजाती आढळत होत्या. कालौघात अनेक अनेक प्राणी-पक्ष्यांची मुंबई फक्त माणसांची होत गेली. असे असतानाही, काही वन्यप्रजाती अजूनही वाढत्या शहरीकरणाला तोंड देत तग धरून आहेत. त्यातील एक दुर्मीळ असा सोनेरी कोल्हा.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

सुमारे दोन शतकापूर्वीही मुंबईतील विविध भागात सोनेरी कोल्ह्याचा (गोल्डन जॅकल) वावर असल्याचे दाखले मिळतात. तर, आताही मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात सोनेरी कोल्हा आढळतो. कांदळवन परिसंस्थेतील हा प्रमुख सस्तन प्राणी असून देखील त्यावर अद्याप नियोजनबद्ध सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे त्यांची संख्या, माहिती तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी, सोनेरी कोल्हा अजूनही काहिसा दुर्लक्षित आहे.

मलबार आणि कंबाला या मुंबईतील दोन टेकटय़ा आता श्रीमंती वसाहतींसाठी ओळखल्या जातात. तेथे पूर्वी इतर वन्यप्रजातींप्रमाणे सोनेरी कोल्ह्यांचा वावर मोठय़ा संख्येने होता. या दोन्ही टेकडय़ांसह बेटांवर तुरळक लोकवस्तीच्या ठिकाणी, मुंबईच्या उत्तरेकडील भागात सोनेरी कोल्हे आढळून येत होते. त्यांचा काही पुस्तकांत उल्लेख असून साधारण १७८ वर्षांपूर्वी सोनेरी कोल्ह्याचा अधिवास असल्याची नोंद आहे. १८४४ साली डॉ. जॉर्ज बुइस्ट यांनी कुलाबा वेधशाळेच्या बागेत अनेक वेळा सोनेरी कोल्हा पाहिला होता. तर, चार्ल्स चेंबर्स यांना १८७८ साली कुलाबा वेधशाळेतील त्यांच्या खोलीतून एकदा सोनेरी कोल्हा दिसला होता. त्याचवर्षी नवीन उच्च न्यायालयाच्या इमारतीत एक सोनेरी कोल्हा मारला गेला. तर, १९१३-१४ च्या थंडीच्या हंगामात, मेजर कुनहार्ट यांनी चर्नी रोड रेल्वे स्थानक ते केनेजी समुद्र किनारा (मरीन ड्राईव्ह) पर्यंत जंगली श्वानांना सोनेरी कोल्ह्याचा पाठलाग करताना पाहिले होते. तर, १९०४ मध्ये सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या आवारात एक कोल्हा पकडण्यात आला होता. (या नोंदी बॉम्बे पास्ट अँड प्रेझेंट, मुंबई येथे जानेवारी १९२६ मध्ये झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तेराव्या बैठकीचा स्मरणिका मधील आहेत.)

सोनेरी कोल्हा (कॅनिस ऑरियस) युरोप, आफ्रिका, आशियाच्या काही भागात आढळतो. कांदळवनाच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात मानवी वस्ती असल्याने सोनेरी कोल्ह्यासाठी मुंबईतील कांदळवन हा एक असुरक्षित अधिवास आहे. मात्र त्यांचे अधिवास क्षेत्र आता कमी होत असल्याने त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. अनेक वेळा विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदिवली, ऐरोली, विरार, चेंबूर येथील कांदळवन क्षेत्रालगतच्या मानवी वस्तीत सोनेरी कोल्हा शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या देशात सोनेरी कोल्हा संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच मुंबई महानगरात दिसणाऱ्या सोनेरी कोल्ह्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कांदळवन प्रतिष्ठान आणि खासगी संस्था यंदा सर्वेक्षण करणार आहेत. त्यात मुंबई महानगरातील कांदळवन परिसरात आढळणाऱ्या सोनेरी कोल्ह्याचे पर्यावरणशास्त्रीय महत्त्व समजून घेऊन, त्यांचे वास्तव्य, खाद्य, दैनंदिन जीवनाचा अभ्यास केला जाणार आहे. यांचा अभ्यास करण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात त्याविषयी सखोल, नवीन माहिती उपलब्ध होईल.