परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चिपळूण- मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चार तासांपासून चिपळूणमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दरड कोसळून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सध्या हलक्या वजनाची वाहतूक कळंबस्ते- आंबडस- लोटे मार्गे वळविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा –उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत

दोन दिवसांपूर्वीच कोसळली होती दरड

गेल्या दोन दिवसांपूर्वीच मुंबई- गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली होती. दरड कोसळ्यानंतर काही काळ मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, या महामार्गावर पुन्हा दरड कोसळ्याची शक्यता असल्यामुळे ही वाहतूक तात्पुरती चिरणीमार्गे वळवण्यात आली होती. मुंबई- गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा- “शिंदे-फडणवीस सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधीसाठी तयार राहा”; पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. चौपदरीकरणाच्या कामासाठी एप्रिल आणि मे महिन्यात घाट दिवसभर बंद करण्यात आला होता. पण ते जेमतेम ६० टक्के झाले आहे. या दरम्यान घाटातील धोकादायक डोंगरकटाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parashuram ghat closed for traffic due to landslides dpj
First published on: 04-07-2022 at 22:36 IST