शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवून मुलांचे शिक्षण वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येत्या गुपौर्णिमेपासून पालकांना संघटित करण्याचा निर्णय शिक्षण हक्क कृती समितीतर्फे घेण्यात आला आहे. यानुसार येत्या १२ जुलपासून शिक्षणहक्क पालक अभियान राबविण्याची घोषणा कृती समितीने केली आहे.
हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा सरकार निर्णय स्थगित झाला असला तरी राज्यातील ६४ हजार शिक्षकेतर कर्मचारी मात्र अतिरिक्त ठरले आहेत. या प्रश्नाबरोबर शिक्षण इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षण हक्क कृती समितीचे अध्यक्ष प.म.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समितीची एक महत्त्वपूर्ण बठक बुधवारी पार पडली. त्यावेळी वरील निर्णय घण्यात आला असून या अभियानाअंतर्गत सर्व शाळांमध्ये पालक सभा घेऊन जनजागृती करण्याचे कृती समितीने निश्चित केले असल्याची माहिती समितीचे निमंत्रक अमोल ढमढरे
यांनी दिली.