मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दादर – माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना बुधवारी सकाळी लोकलची धडक लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे बुधवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.
दादर – माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत होता. यावेळी धावत्या डाऊन लोकलसमोर प्रवासी आला आणि त्याला लोकलची जोरदार धडक लागली.

सदर प्रवाशाच्या डोक्याला इजा झाली. रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून जखमी व्यक्तीला मृत घोषित केले. संबंधित प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास सुरू आहे, असे मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल काही काळ कूर्मगतीने धावत होती. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

mumbai local train services, central railway, Technical Fault, vikhroli station
मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ
14 hour megablock of railway between Ballarpur Gondia
बल्लारपूर- गोंदिया दरम्यान रेल्वेचा १४ तासांचा मेगाब्लॉक,दोन मेमू पॅसेंजर रद्द, दरभंगा, कोरबा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
superfast express trains
कोकण रेल्वे मार्गावरील तीन अतिजलद एक्स्प्रेस दादरपर्यंत धावणार
Mumbai Metro, Additional metro train
पश्चिम रेल्वे विस्कळित झाल्याने मेट्रोची अतिरिक्त ट्रेन सेवा
virar railway station overcrowded
तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे लोकल सेवा विस्कळित, विरार रेल्वे स्थानकात तुफान गर्दी
Passengers frustrated by cancelled and late running local trains
ठाणे :रद्द केलेल्या आणि उशिराने धावत असलेल्या लोकल गाडीतील प्रवासामुळे प्रवासी हैराण
palghar western railway marathi news
तब्बल २४ तासांनी पश्चिम रेल्वे रूळावर, पालघर मालगाडी डबे घसरल्याची होणार उच्चस्तरीय चौकशी
palghar train derailed marathi news
पालघर: रेल्वे दुरुस्तीचे काम पूर्ण, रेल्वे सेवा पूर्ववत

हेही वाचा…गायक नंदेश उमपही निवडणुकीच्या मैदानात; ईशान्य मुंबईत बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी

रेल्वे रूळ ओलांडून सर्वाधिक मृत्यू

जानेवारी – डिसेंबर २०२३ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे अपघातात २,५९० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २,४४१ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले. रुळ ओलांडताना १,२७७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये १,१६८ पुरुष आणि १०९ महिला प्रवाशांचा समावेश आहे. यापैकी मध्य रेल्वेवर रेल्वे रुळ ओलांडताना ७८२ आणि पश्चिम रेल्वेवर ४९५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, या घटनेत एकूण २४१ प्रवासी जखमी झाले असून यात मध्य रेल्वेवरील १४८ आणि पश्चिम रेल्वेवरील ९३ प्रवाशांचा समावेश आहे.