मुंबई : महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून एसटीकडे पाहिले जाते. ‘जिथे रस्ता, तिथे एसटी’ असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. मात्र तरीही नवीन बस फेरी सुरू करण्याची मागणी ‘प्रवासी राजा दिनी’ करण्याची वेळ प्रवाशांवर आली. तर, एसटी कामगारांनी रजा मंजूर होत नसल्याच्या तक्रारी ‘कामगार पालक दिनी’ केली आहे.

बुलढाणा विभागातून प्रवाशांच्या सर्वाधिक म्हणजे ६८ तक्रारी आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून कामगाराच्या सर्वाधिक म्हणजे १०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात अनुक्रमे ५५ आणि ९४ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. प्रवासी व कामगारांच्या समस्या, तक्रारी, सूचनांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निपटारा होण्यासाठी एसटी महामंडळाने सकारात्मक पावले उचलली आहेत. एसटीच्या विविध बसमधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची वाहतूक होते. या प्रवाशांना नेहमी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रवाशांच्या या समस्या जाणून घेण्यासाठी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा केला जात आहे. तर, एसटीच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या ‘कामगार पालक दिन’ या उपक्रमांतर्गत आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेण्यात येत आहेत.

The government official and the police were cheated of lakhs of rupees by unknown scammers solhapur
शासकीय अधिकाऱ्यासह पोलिसाला अज्ञात भामट्यांकडून लाखोंचा गंडा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
Petrol Diesel Price Today 9th September 2024
Petrol & Diesel Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट; ठाण्यासह ‘या’ शहरांत… वाचा महाराष्ट्रातील आजचे दर
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : गडकरींचे वक्तव्यही ‘रणनीती’च?
Case of trees felled for construction of stations in Metro 3 project only 724 out of 3093 trees replanted
मेट्रो ३ प्रकल्पात स्थानकांच्या बांधकामासाठी झाडे तोडल्याचे प्रकरण, ३०९३ झाडांपैकी केवळ ७२४ झाडांचेच पुनर्रोपण
protest ST employees, protest ST Ganesh utsav,
ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन होणार
Nashik, Change traffic route Nashik,
नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

हेही वाचा – मुंबई : महागड्या दुचाकी चोरणाऱ्या सराईत आरोपीला अटक

प्रत्येक आगारात १५ जुलैपासून आठवड्याच्या दर सोमवारी व शुक्रवारी हे उपक्रम साजरे करण्यात येतात. जुलै महिन्यात २५१ पैकी १५१ आगारात उपक्रम साजरे करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या ७०६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३१९ तक्रारींचा निपटारा झाला असून, ३८७ तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. याबरोबरच कामगारांकडून ९६२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ३०३ तक्रारींचे निर्मूलन झाले असून, ६५९ तक्रारींचे निर्मूलन करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यात मुंबई विभागातून प्रवाशांच्या ३१ तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या सोडवण्यात देखील आल्या. तर, कामगारांच्या ३६ तक्रारी दाखल झाल्या आणि त्यामधील ३३ तक्रारी सोडवून ३ तक्रारी प्रलंबित आहेत.

हेही वाचा – भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर एटीएसची कारवाई, २४६ सिमकार्डसह १९१ अँटीना जप्त, आरोपीला अटक

प्रवाशांच्या प्रमुख तीन तक्रारी

– बस फेरी सुरू करावी

– बसची वेळ बदलावी

– बस वेळेवर सुटत नाही.

कामगारांच्या प्रमुख तीन तक्रारी

– रजा मंजूर केली नाही.

– वाढीव कालावधी भत्ती मिळाला नाही.

– सेवा ज्येष्ठता डावलण्यात आले.