जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवत आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे वेतन आणि तृतीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांची थकबाकी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. डॉक्टरांच्या संपाचे पडसाद गुरुवारी सकाळी बाह्यरुग्ण विभागात उमटले. निवासी डॉक्टर नसल्याने बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा >>> मुंबईः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
navi mumbai, 12 year old boy killed
शरीर सूखासाठी १२ वर्षीय बालकाचा खून, नवी मुंबई पोलिसांनी १६ तासांत मारेकऱ्याला ताब्यात घेतले
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित

आपल्या चार मागण्यासाठी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळेच बुधवारी डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नेत्रशल्य चिकित्सा विभागातील सात डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. मात्र त्याचा कोणताच परिणाम निवासी डॉक्टरांच्या संपावर झालेला नाही. निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळी संपावरच होते. बाह्यरुग्ण विभागामध्ये एकही निवासी डॉक्टर नसल्याने रुग्ण सेवेचा सर्व भार वरिष्ठ डॉक्टर आणि प्राध्यापकांवर पडला होता. मात्र डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्ण सेवा बाधित होऊन रुग्णांना तासंतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. अनेक रुग्ण गर्दी पाहून घरी गेले. तसेच अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून काही महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र त्याचे प्रमाण फारच कमी आहे. परिणामी, निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका सहन करावा लागला.

बाह्यरुग्ण विभागात प्राध्यापक आणि वरिष्ठ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. – पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय