मुंबई: राज्यातील सर्व सरकारी विभागाकडील कंत्राटदारांची ८६ कोटींची देयके गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग २७ हजार कोटी,जलजीवन मिशन ३८ हजार कोटी, ग्रामविकास विभाग ३५०० कोटी , आदिवासी विभाग १२ हजार कोटी , पर्यटन विभाग २५०९ कोटी , जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास सह इतर अनेक विभागाकडील देयके प्रलंबित आहेत.

गेल्या १ वर्षात जवळपास ९ ते १० कंत्राटदार यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना ने सातत्याने आंदोलन, धरणे आंदोलन, मोर्चा काढला, मंत्रालय मध्ये संबंधित खात्याचे मंत्री यांना भेटले, पण याचा काही उपयोग होत नाही, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दहा वेळा संघटनेच्या शिष्टमंडळ बरोबर बैठक घ्यावी अशी दहा वेळा विनंती पत्र दिले, संबंधित कडे बैठकीसाठी दुर्दैवाने वेळ मिळत नाही असा आरोप राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे.

दिवाळी आठ दिवसावर आली आहे,सगळृयांच सगळं झालं जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका,पदृवीधर,शिक्षक निवडणूक झाले,पगार झाले ,भत्ता झाला, शासनाकडे दमडी नाही अशी गत आहे यामुळे कोणीही मंत्री व सचिव फोन उचलत नाही,कोणीही उत्तर देण्याचे धाडस दाखवत नाही,अशा गंभीर परिस्थितीत आता राज्यातील या झोपलेल्या वा झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील तीन लक्ष कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणाऱ्या करोडो घटक आता शासनास मंत्रालय मध्येच फोन करून आमची देयके कधी देणार म्हणून जाब विचारणार आहेत.

यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांनी खालील दिलेल्या दिवशी फोन करतील आणि शासनाचे कॅबिनेट दिवशी एकाच वेळी लाखो फोन या आंदोलनामधुन मंत्रालय मध्ये जातील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, प्रकाश पालरेचा, अनिल पाटील, सुरेश कडु पाटील, प्रकाश पाडंव‌, अभियंता संघटना महासचिव राजेश देशमुख, दिपेश कोलुरवार, समीर शेख, कांतीलाल डुबल, अश्विन पवार, राज्य पाणीपुरवठा संघटना कार्यकारी अध्यक्ष शरद पाटील, आनंद तोडकरी यांनी सांगितले.