प्राणिसंग्रहालयाला १२ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न

मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात (राणीची बाग) पेंग्विन दाखल झाल्यापासून प्राणि संग्रहालयाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पेंग्विन आल्यानंतर २०१७ पासून पालिके ला १२ कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळाला असल्याचा प्रशासनाचे म्हणणे आहे. पेंग्विनमुळे पालिके चे आर्थिक नुकसान होत असल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचेही प्रशासनाचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिके ने पेंग्विनच्या देखभालीसाठी पुढील तीन वर्षांकरिता १५ कोटींचे कं त्राट देण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. त्यावरून भाजप आणि काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला व पालिका प्रशासनाला लक्ष्य के ले आहे. हा १५ कोटी रुपये खर्च म्हणजे पालिके चा तोटा असल्याची टीका दोन्ही पक्षांनी के ली आहे. पालिके चे उत्पन्न बुडालेले असताना पेंग्विनवर इतका खर्च करणे योग्य नसल्याचीही टीका होऊ लागली आहे. टाळेबंदीच्या काळात पेंग्विनची देखभाल म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे असल्याची टीका भाजपच्या नगरसेवकांनी के ली होती. मात्र पेंग्विनमुळे कोटय़वधींचा महसूल मिळाला असल्याचा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी के ला आहे.

राणीच्या बागेत पेंग्विन येण्यापूर्वीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपयांच्या आत होते. २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत मिळून दोन कोटी १० लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. मात्र पेंग्विन आल्यानंतर एप्रिल २०१७ पासून मार्च २०२० पर्यंतचे पालिके चे एकू ण उत्पन्न १४.३६ कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच पेंग्विनमुळे निव्वळ १२.२६ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा दावा पालिका आयुक्तांनी के ला आहे. पेंग्विन पक्षी आणण्याचे एकू ण कं त्राट ११.४६ कोटी रुपये होते. पेंग्विनच्याबाबत खर्चापेक्षा जास्त उत्पन्न होते असाही दावा आयुक्तांनी के ला आहे.

पर्यटक संख्या व उत्पन्न वर्ष पर्यटक  उत्पन्न रुपये

एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ १२ लाख ४०हजार    ६७,०३,४४९

एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ १२ लाख ५१ हजार    ७०,०३,२५६

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ १३ लाख ८० हजार    ७३,६५,४६४

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ १७ लाख ५७ हजार    ४,३६,६६,९९८

एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ १२ लाख ७१ हजार    ५,४२,४६,३५३

एप्रिल २०१९ ते मार्च २०२० १० लाख ६६ हजार    ४,५७,४६,१५०

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Penguin increased revenue municipality municipality ssh
First published on: 09-09-2021 at 00:46 IST