मुंबई : हवामान बदलाच्या भीतीने विकसनशील देशांत पायाभूत प्रकल्प थांबवण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी करीत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सागरी किनारा मार्गाशी संबंधित विकासकामे एकत्रितपणे सुरू करण्यास मुंबई महापालिकेला परवानगी दिली. त्यामुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील सार्वजनिक वाहनतळे, उद्यान, प्रसाधनगृह आदी कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरी किनारा प्रकल्पास मिळालेल्या विविध परवानग्या केवळ रस्त्यासाठी असून इतर नागरी सेवा सुविधांसाठी नाहीत, असा आक्षेप घेत काही सामाजिक संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आवश्यक पर्यावरणीय परवानग्या घेतल्या नाहीत, या कारणास्तव उच्च न्यायालयाने २०१९मध्ये सागरी मार्गाच्या कामाला स्थगिती दिली होती. त्याला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र त्याचवेळी प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यास मनाई केली होती. न्यायालयाने महापालिकेला केवळ रस्त्याचे बांधकाम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. हाच आदेश ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानेही कायम ठेवला होता. त्यानंतर या प्रकरणावर सुनावणी झाली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑक्टोबर २०२०च्या आदेशात सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेला अर्ज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मान्य केला. केवळ सागरी मार्गाच्या बांधकामासाठी समुद्रात भराव टाकण्याची परवानगी ऑक्टोबर २०२० च्या आदेशात देण्यात आली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission development works coastal road projects fear climate change not right supreme court ysh
First published on: 02-10-2022 at 01:29 IST