शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. विशेष न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुखर्जी यांना सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) कोठडीत ठेवण्याची गरज उरली नसल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी सांगितले. मुखर्जी यांना सीबीआयने १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतून ताब्यात घेतले होते.  काही दिवसांपूर्वीच पीटर मुखर्जी याची सत्यशोधन चाचणी (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यात आली होती.