scorecardresearch

‘मेट्रो २ बी’ च्या बांधकामाविरोधात याचिका

 जुहूस्थित सामाजिक कार्यकर्ते हरित देसाई यांनी ही जनहित याचिका केली आहे.

मुंबई : जुहू येथील स्वामी विवेकानंद (एसव्ही) मार्गावरून जाणाऱ्या डीएन नगर ते मानखुर्द या उन्नत मेट्रो २ बीच्या बांधकामाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (डीजीसीए) आपला अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. विमानतळ परिसरातील बांधकामांच्या उंचीबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून या प्रकल्पाला परवानगी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिका सार्वजनिक प्रकल्पाशी संबंधित असल्याने प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 जुहूस्थित सामाजिक कार्यकर्ते हरित देसाई यांनी ही जनहित याचिका केली आहे. तसेच विमान उड्डाणातील सुरक्षेसाठी नागरी उड्डयन मंत्रालयाने घातलेल्या उंचीच्या नियमांचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०१७ मध्ये उल्लंघन करून फनेल क्षेत्रात मेट्रो २बीच्या बांधकामास परवानगी दिली, असा आरोप केला आहे. बांधकामास ना हरकत प्रमाणपत्र देताना उड्डाणातील संभाव्य धोका लक्षात घेण्यात आलेला नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.  मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petition against construction of metro 2b akp