मुंबई महानगरपालिकेकडून चालविण्यात येणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जंबो करोना केंद्रातील कारभाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. करोनाकाळात या करोना केंद्रात वैद्यकीय निष्काळजी करण्यात आल्याचा आरोप करून ३६ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पदपथ चालण्यायोग्य करा, अतिक्रमणे हटविण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

अंधेरीस्थित दीपक शहा (५४) यांनी ही याचिका केली आहे. तसेच बीकेसीतील जंबो करोना केंद्रातील डॉक्टरांचा वैद्यकीय निष्काळजी आणि अयोग्य वैद्यकीय उपचार पद्धतीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याचा आरोप याचिकेत केला आहे. याचिकेनुसार, शहा यांचे मार्च २०२१ रोजी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात जाळी बसविण्यात आली होती. मात्र त्याचदरम्यान, एप्रिल २०२१ रोजी शहा यांना करोनाचा संसर्ग झाला आणि बीकेसी येथील करोना केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. शहा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शस्त्रक्रियेची आणि पोटावरील जखमेची माहिती डॉक्टरांना दिली होती. तरीही केंद्रातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीने शहा यांच्या पोटात दररोज इंजेक्शन्स दिली गेली. त्यातूनच शस्त्रक्रियेच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा आरोप शहा यांनी केला आहे.

हेही वाचा– मुंबईतील आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

करोना केंद्रातून घरी सोडण्यात आल्यावर शहा यांची पोटदुखी वाढली. त्यांनी चाचणी केली असता पोटात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोटात बसवलेली जाळी काढण्यासाठी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या शस्त्रक्रियातून शहा अद्यापही सावरलेले नाहीत. ते अंथरुणाला खिळलेले आहेत. डॉक्टरांच्या या निष्काळजीमुळे याचिकाकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

हेही वाचा- मुंबई: आता विकासक आणि घरखरेदीदारांचेही समुपदेशन; महारेराचे महत्त्वाचे पाऊल, मुख्यालयात सुरु केला समुपदेशन कक्ष

करोना केंदातील डॉक्टरांच्या या निष्काळजी आणि अयोग्य वैद्यकीय उपचारांची स्वतंत्र वैद्यकीय मंडळ स्थापना करून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तसेच आपल्याला झालेल्या आर्थिक नुकसानाची ३६ लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही शहा यांनी केली आहे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petition filed against negligence in jumbo corona center in bkc mumbai print news dpj
First published on: 07-02-2023 at 10:34 IST