मुंबई : बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.

राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला होता. त्याच्या एक दिवस आधीच बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण केल्याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने शुक्ला यांनी अटकेसारख्या कठोर कारवाईपासून संरक्षण दिले होते. गुन्हा नोंदवण्यात तीन वर्षांचा विलंब झाल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवून न्यायालयाने शुक्ला यांना दिलासा दिला होता.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”