अनिल देशमुखांच्या स्वीय सचिवांची कारवाई रद्द करण्यासाठी याचिका

पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, हा आरोप चुकीचा आहे.

Anil deshmukh cbi viral fake clean chit Maharashtra

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘देशमुखांवरील आरोप चुकीचे असून ‘ईडी’ची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. एवढेच नव्हे, तर देशमुखांविरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठीच आपल्यालाही याप्रकरणी गोवण्यात आले,’ असा दावा पालांडे यांनी याचिके त के ला आहे.

‘पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती, हा आरोप चुकीचा आहे. किं बहुना नियुक्त्या-बदल्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असते आणि मुख्यमंत्री पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार या बदल्या-नियुक्त्या करत असतात,’ असाही दावा पालांडे यांनी के ला आहे.

त्यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश ‘ईडी’ला न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने दिले आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी पातळीवरील पालांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

वाझेंचे आरोप निराधार’

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या निराधार आरोपांच्या आधारे ‘ईडी’तर्फे  कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप पालांडे यांनी याचिकेत केला आहे. वाझे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात आहेत. ‘एनआयए’सुद्धा केंद्रीय यंत्रणा आहे. त्यामुळे देशमुख यांच्याविरोधात खोटे पुरावे तयार करण्याच्या आणि सरकार अस्थिर करण्याच्या हेतूनेच आपल्यावर ‘ईडी’ने अटकेची कारवाई केल्याचाही आरोप याचिके त करण्यात आला आहे. ज्या प्रकरणाशी आपला संबंध नाही. त्याच प्रकरणातील गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने आपल्यावर कारवाई के ली. त्यामुळे ‘ईडी’ची कारवाई ही अधिकारक्षेत्राबाहेरील आहे. त्यामुळे आपल्याविरोधातील प्रकरण रद्द केले जावे, अशी मागणी पालांडे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Petition to quash the action of anil deshmukh personal secretary akp

ताज्या बातम्या