आगामी काळात मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचा पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. यामध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सध्या हा जकात कर तीन टक्के असून, तो साडेचार टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारी दुपारी ३७,०५२.१५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर केला.