नवी दिल्ली : इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आणि नवी विक्रमी वाढ नोंदवली. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर दर ३५ पैशांनी वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर १११ रुपये ४३ पैसे झाला, तर दिल्लीत त्याने १०५ रुपये ४९ पैसे असा नवा उच्चांक नोंदवला. मुंबईत डिझेलचे दर १०२ रुपये १५ पैसे, तर दिल्लीत ते ९४ रुपये २२ पैशांवर गेले आहेत. इंधनातील ही सलग तिसरी दरवाढ आहे. गेल्या तीन आठवडय़ांतील पेट्रोलमधील ही १५ वी, तर डिझेलमधील १८वी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे, सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.