जनहित याचिके द्वारे मागणी

मुंबई : ‘कोविन’ या संकेतस्थळावर लसीकरणासाठी नोंदणी करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी स्वतंत्र संके तस्थळ सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी एका शिक्षिकेने जनहित याचिके द्वारे केली आहे.

फोर्ट येथील शाळेत शिकवणाऱ्या योगिता वंजारा यांनी ही जनहित याचिका केली आहे. ‘कोविन’वरून नोंदणी करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मानसिक त्रास होण्यासह ताणही येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

लसीकरण नोंदणीची अमूक वेळ उपलब्ध असल्याचे संके तस्थळावर मध्यरात्री वा त्यानंतर प्रसिद्ध के ले जाते. नंतर काही सेकंदांमध्ये ती वेळ भरल्याचे सांगितले जाते. शिवाय ‘कोविन’वर एक-वेळच्या संकेतशब्दासह लॉगिन करावे लागते. सव्‍‌र्हरवर ताण येत असल्याने बराच वेळानंतर संकेतशब्द उपलब्ध केला जातो. परंतु त्यानंतर लसीकरण केंद्रे दाखवली जात नाहीत. बऱ्याचदा वेगळीच लसीकरण केंद्रे दाखवली जातात. तेथे नोंदणी झाल्याचेही दाखवले जाते.

नोंदणी करताना होणारा त्रास

एखाद्या लसीकरण केंद्रात नोंदणीची वेळ उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आले, तर तिथे नोंद करण्यासाठी आवश्यक असलेली संके ताक्षरे (कॅप्चा कोड) अनेकदा प्रदर्शित केली जात नाहीत वा ती चुकीची असल्याचे दाखवले जाते. या अडचणींमुळे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करणे कठीण होऊन बसले आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.