Corona Virus: ‘खासगी कंपन्यांनी Work From Home चा पर्याय कर्मचाऱ्यांना द्यावा’

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी कंपन्यांना आवाहन

मुंबई, पुणे, पिंपची चिंचवड, नवी मुंबई, ठाणे येथील खासगी कंपन्यांनी शक्य असेल तेवढ्या रुग्णांना Work From Home अर्थात घरुन काम करण्याचा पर्याय द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसचा फटका खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला बसलेला नाही. मात्र हे संकट हे उंबरठ्यावरुनच परत जावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Please implement work from home cm uddhav thackerays appeal to private companies scj