नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चेंबूर आणि गोवंडी परिसरातील १८ बारवर पोलीस उपायुक्त परिमंडळ- ६ च्या पथकांनी कारवाईचा बडगा उगारला असून हे सर्व बार चेंबूर, टिळकनगर, नेहरू नगर, चुनाभट्टी आणि गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. याप्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

हेही वाचा- मुंबई: बंदी असतानाही गुटख्याची वाहतूक; साडेपाच लाख रुपयांच्या गुटख्यासह दोघांना अटक

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

राज्यात डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, सध्या वाद्यवृंदाच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. बारमध्ये वाद्यवृंद सुरू करण्यासाठी शासनाने नियम आणि अटी घातल्या आहेत. चेंबूर आणि गोवंडीतील अनेक बारमध्ये या नियम आणि अटींचे उल्लंघन होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ च्या कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ६ च्या पथकाने चेंबूर पोलीस ठाणे हद्दीतील नऊ, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीतील चार, गोवंडी पोलीस ठाणे हद्दीतील एक, नेहरू नगर पोलीस ठाणे आणि चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन आशा एकूण १८ बारवर कारवाई केली. याप्रकरणी काही जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटक करण्यात आली आहे.