scorecardresearch

पोलीस भरतीमध्ये तोतया उमेदवाराला अटक

फसवणूक व बनावट कागदपत्र बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : पोलीस भरतीतील शारीरिक चाचणीमध्ये तोतया उमेदवार सहभागी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कागदपत्रांच्या छाननीमध्ये हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी बीडमधील तरुणाला शनिवारी भोईवाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्र बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बाळानाथ दशरथ पवार (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो बीडमधील नाळवंडी येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी १६ डिसेंबरला भोईवाडा पोलिसांच्या हद्दीतील नायगाव पोलीस मैदानात बाळानाथ याची कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. त्या वेळी बाळानाथचे छायाचित्र व स्वाक्षरीचा नमुना घेण्यात आला होता. त्यानंतर १७ डिसेंबरला बाळानाथ याला मरोळ येथील पोलीस मैदानात चाचणी द्यायची होती. पण तेथे बाळानाथच्या बदली गणेश कानिफनाथ पवार (२८) हा उपस्थित राहिला. या वेळी आपणच बाळानाथ पवार असल्याचे भासवून खोटी कागदपत्र सादर केली शारीरिक चाचणीही दिली. त्यानंतर या प्रकरणातील तक्रारदार व पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल प्रभू यांना कागदपत्रांची पडताळणी करत असताना गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. त्यानंतर सीसीटीव्हीच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police arrest fake candidate akp

ताज्या बातम्या