मुंबई : लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून ३ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुजरातमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी त्याचे नाव बदलून पोलिसांचा समेमिरा चुकवत होता. तसेच त्याने अटक टाळण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या तीन वर्षांच्या काळात आरोपी गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश परिसरात परिसरात फिरत होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात १८ जुलै २०२२ मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण व तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांतील आरोपी नौशाद इसरार अहमद वय २२ वर्षे हा गुन्हा दाखल झाल्यापासून परराज्यात पळून गेला होता. तो रआपले अस्तित्त्व लपवून तीन वर्षांपासून गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथील विविध ठिकाणी वास्तव्याला होता. यावेळी त्याने स्वतःचे नाव व ओळखही बदलली होती. गेल्या तीन वर्षांंपासून आरोपीने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ६५ सिमकार्डचा वापर केला. त्याद्वारे तो पोलिसांना गुंगारा देत होता.

आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी हा गुजरातमधील पदमला परिसरातील कुरियर कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून कामाला असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नौशादचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो गुजरात राजस्थान, दिल्ली, उत्तरप्रदेश येथे वारंवार प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार वारंवार तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील नौशाद याची माहिती मिळवली. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथक गुजरातमध्ये रवाना झाले. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी सापळा रचला. पथकाने सापळा लावल्यानंतर नौशादला पकडण्यासाठी घेराव घातला. त्यानंतर त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. यावेळी आरोपीची पडताळणी करण्यात आली असतो तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपीच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करून मुंबई आणण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी नाव व ओळखही बदली होती. तसेच पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी त्याने ६५ सिमकार्डचा वापर केला. ती सीमकार्ड आरोपीने कशी खरेदी केली याबाबतही पोलीस तपास करत आहेत. सर्व सिमकार्ड आरोपीने गुजरातमधून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबतची माहिती लवकरच स्थानिक पोलिसांना देण्यात येणार आहे. यापूर्वीही आरोपीला अटक करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले होते. पण आरोपी चालक असल्यामुळे विविध राज्यांमध्ये फिरत होता. त्यामुळे त्याचा माग काढणे कठीण झाले होते.