लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अंधेरीत बेस्ट चालकाशी वाद घालणाऱ्या तरुणाला हटकल्याच्या राग आल्याने तरूणाने पोलिसालाच मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तुषार सावंत (२३) याला अटक केली आहे.

Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय

आणखी वाचा-खेरवाडी येथे मोटरगाडीच्या धडकेत अंध व्यक्तीचा मृत्यू

एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले भगवान हबती मिसाळ (५१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मिसाळ हे मरोळ मरोशी रोड परिसरात कर्तव्य बजावत असताना, सावंत हा एका बेस्ट चालकाशी वाद घालताना दिसून आला. घटनेची माहिती मिसाळ यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी, सावंतला शांत राहण्यास सांगताच त्याने मिसाळ यांना देखील धक्काबुकी सुरु केली. शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना धमकावले. अखेर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Story img Loader