देवनार आगप्रकरणी दोन आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी रफीक व आतिक या दोन आरोपींना आज सकाळी अटक केली होती.

देवनार कचरा डेपोला वारंवार लागणा-या आगप्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
देवनार आगप्रकरणी पोलिसांनी रफीक व आतिक या दोन आरोपींना आज सकाळी अटक केली होती. त्यानंतर या दोघांनाही पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने या दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या दोघांनी भंगार विक्रेत्यांना जबरदस्तीने डंपिंग ग्राऊंडमध्ये आग लावण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे दोघेही देवनार डंपिंग ग्राऊंडच्या आसपासच्या परिसरातच राहतात, असेही समजते.
यापूर्वी पोलिसांनी एकूण १३ भंगार विक्रेत्यांना आग लावल्याप्रकरणी अटक केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police custody to two main accused for deonar dumping ground fire