महिला रेल्वे डब्यात सायंकाळी ७ पासून पोलीस तैनात

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून करोनाच्या आधी दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करत होते.

मुंबई:  लोकल रेल्वे मधील महिला डब्यातील आधीच्या सुरक्षा वेळेत व ठिकाणे कायम ठेवून त्यात आणखी काही सुरक्षा उपायांचा समावेश केला आहे. सायंकाळी ७ पासून उपनगरीय रेल्वेच्या मधल्या स्थानकातून अप व डाऊन मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या महिला डब्यातील प्रवाशांची कमी होणारी संख्या पाहता लोहमार्ग पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रायोगिक  तत्वावर अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी  दिली.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून करोनाच्या आधी दिवसाला ७५ ते ८० लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करत होते. यात महिलांची संख्या १५ ते २० टक्के होती. आता अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास असला तरीही दिवसाला एकू ण २० ते २५ लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांचे प्रमाणही बरेच असते.  तीन महिला डब्यांत आता संध्याकाळी ७ पासून पोलीस तैनात असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police deployed in women train coach 7 pm akp

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या