मुंबई: अश्लील नृत्य सुरू असलेल्या घाटकोपरमधील एका बारवर रविवारी पहाटे घाटकोपर पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी या बारमधून आठ बारबालांची सुटका केली असून याप्रकरणी पोलिसांनी बारचा व्यवस्थापक आणि एका ग्राहकाला अटक केली.घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘दशमेश पंजाब’ या बारमध्ये बारबाला अश्लील नृत्य करीत असल्याची माहिती घाटकोपर पोलीसांना मिळाली.
त्यानुसार घाटकोपर पोलिसांच्या एका पथकाने रविवारी पहाटे बारवर छापा घातला. पोलिसांनी या कारवाईदरम्यान आठ बारबालांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी बारमधील एक ग्राहक आणि बारच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.