मुंबईः कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून स्वतः या प्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लांगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला.  हा प्रकार २९ जुलै ते ३० जुलैदरम्यान घडला. पण भीतीने पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

हेही वाचा >>> ‘मेट्रो ३’ स्थानक परिसरात २९३१ वृक्ष लागवडीसाठी तीन कंत्राटे; प्रती झाड ४१ हजार रुपये खर्च – एकूण खर्च १२ कोटी रुपयांवर

right to education
अर्ज करूनही ‘आरटीई’मध्ये अद्यापही प्रवेश मिळाला नसेल तर हे करा, शेवटची संधी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
nala sopara school girl rape case marathi news
नालासोपार्‍यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
cet tet exam marathi news
अनुंकपा तत्त्वावरील शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेबाबत मोठा निर्णय… आता काय होणार?
molestation of minor girl, minor girl molestation in pune, tution teacher, case register, case of molestation,
पुणे : विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
Sandeep Ghosh CBI
Kolkata Rape Case : कोलकात्यातील आर. जी. कर कॉलेजच्या माजी प्राचार्यांच्या घरी सीबीआयची धाड; गैरव्यवहारप्रकरणी होणार चौकशी!

शाळेतील मुख्याध्यापिकेने पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी चर्चा केली. त्यावेळी विद्यार्थिनीने आरोपी शिक्षक तिचा विनयभंग करीत असल्याचे सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याचे मुख्याध्यापिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घेतले व घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यामुळे मुलीच्या आई – वडिलांना धक्का बसला. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवर असल्यामुळे त्यांनीच याप्रकरणा कारवाई करावी, असे त्यांनी मुख्याध्यापिकांना सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिकेने याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४(विनयभंग), ७८ (महिलेला वारंवार संपर्क अथवा पाठलाग करणे), ७९ (अश्लील हातवारे अथवा अश्लील संवाद साधणे) सह पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.